पोलवरच तारांच्या जंजाळात शाॅक लागुन वानराचा जागीच मृत्यु

पोलवरच तारांच्या जंजाळात शाॅक लागुन वानराचा जागीच मृत्यु

*कोकण Express*

*पोलवरच तारांच्या जंजाळात शाॅक लागुन वानराचा जागीच मृत्यु*

*कासार्डे  ः संजय भोसले*

देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या गावी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मस्थळी जात असताना तळेरे— विजयदुर्ग हायवे पासून एक किलोमीटर अंतरावर एका मोठ्या वळणाला इलेक्ट्रिक पोल वर वानर शॉक लागून मृत्युमुखी पडल्याचे काही पादचाऱ्यांच्या दृष्टीस पडले. मात्र ही घटना कधी घडली हे कोणीही निश्चित सांगू शकले नाही.
तसे पाहता इलेक्ट्रिक च्या खांबावर खूप मोठ्या प्रमाणात तारांचे जंजाळ आहे. सदरचे वानर त्यातून पलीकडे असलेल्या अमराईत जाण्याचा प्रयत्नात असावे किंवा रस्ता पार करण्या प्रयत्नात असावे .कांहीही असो मात्र अंदाज चुकल्याने किंवा दुसऱ्या तारांचा स्पर्श झाल्याने अथवा इलेक्ट्रिक पोल वर चढलेल्या वेलींमुळे आर्थींग मिळाले असेल, मात्र त्या वानराला खूप मोठ्या प्रमाणात शॉक लागला असून ते जागीच त्या पोलवर अडकून पडले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी वेळीच त्याची विल्हेवाट लावली नाही तर त्या परिसरात दुर्गंधी पसरण्याचा धोका निर्माण झाला असून पर्यटकांना अथवा गावकऱ्यांना तेथून ये-जा करताना खूप मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार हे नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!