*कोकण Express*
*कोणी कीतीही आंदोलने केली तरी, “तो” स्टाॅल काढणारच*
*संजू परबांचा इशारा; पुन्हा कार्यालयात आंदोलन झाल्यास थेट गुन्हे दाखल करू…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
कोणी कितीही आंदोलने केली, तरी तो “स्टॉल” आपण काढणारच आहे. तशा सूचना मी स्वतः पालिका प्रशासनाला दिल्या आहेत. पालिकेच्या कार्यालयात येऊन कोणी आंदोलन करत असेल, वाट अडवत असेल, ढोल बडवत असेल तर थेट गुन्हे दाखल करू,असा इशारा आज येथे पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला.
दरम्यान संबंधित व्यक्तीने फक्त पंधरा दिवसांसाठी परवानगी मागितली होती. तरीही सहानुभूतीचा भाग म्हणून कोरोनाच्या काळात ते सात महिने त्याला संधी देण्यात आली. मात्र अरेरावीचा प्रकार झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली, आणि या सर्व कारवाईला पालिकेच्या ट्रस्टी असलेल्या जेष्ठ नगरसेवक अनारोजीन लोबो खतपाणी घालत आहेत, असा आरोप केला. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक मनोज नाईक,आनंद नेवगी,सुधीर आडीवरेकर,बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.