कर्मचाऱ्यांचे योगदान संस्था,शाळा कधीच विसरणार नाही:* प्रभाकर कुडतरकर

कर्मचाऱ्यांचे योगदान संस्था,शाळा कधीच विसरणार नाही:* प्रभाकर कुडतरकर

*कोकण Express*

*कर्मचाऱ्यांचे योगदान संस्था,शाळा कधीच विसरणार नाही:* प्रभाकर कुडतरकर*

*सेवानिवृत्त प्राचार्य राजेंद्र नारकर व सहदेव गोसावी यांचा कासार्डे विद्यालयात सपत्नीक सत्कार*

*कासार्डे ः  संजय भोसले*

माजी प्राचार्य आर.व्ही नारकर व प्रयोग परिचर सहदेव गोसावी यांचे कासार्डे माध्यमिक विद्यालयासाठी मिळालेले योगदान संस्था,शाळा कधीच विसरू शकत नाही असे असे गौरवोद्गार कासार्डे विकास मंडळ मुंबई, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर यांना काढले.
कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातीचे सेवानिवृत्त प्राचार्य आर.व्ही.नारकर व प्रयोग परिचारक सहदेव गोसावी यांच्या सेवानिवृत्तपर सत्कार समारंभात ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य एम.डी.
खाड्ये,शिक्षण समिती चेअरमन अरविंद कुडतरकर, संस्था पदाधिकारी आनंद कासार्डेकर,रविंद्र पाताडे, संजय पाताडे,दीपक गायकवाड, सत्कारमूर्ती आर.व्ही.नारकर,सहदेव गोसावी, पर्यवेक्षक नारायण कुचेकर,मारूती वळंजू,
सौ.रंजना नारकर,तसेच सौ.गोसावी व
शिक्षकवृंद आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य एम.डी.खाड्ये यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन व शब्द सुमनाने स्वागत करीत सेवानिवृत्त प्राचार्य श्री.राजेंद्र नारकर व प्रयोग परिचर सहदेव गोसावी यांच्या अनेक आठवणींना उजाळा देत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
……………………………….

*सोन्याची अंगठी व चांदीची मुर्ती देऊन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार..*

कासार्डे विकास मंडळ मुंबई शिक्षण संस्थेच्यावतीने या दोन्ही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा चांदीची मूर्ती,शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन तर शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने प्रत्येकी सोन्याची अंगठी घालून सपत्नीक सत्कार करण्यात आला.तसेच विद्यालयाचे माजी विद्यार्थ्यांच्या “याराना ग्रुपच्या” वतीने तसेच श्रावणी कंप्युटर तळेरेच्या वतीने दोन्ही सत्कारमूर्तीचा शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
……………………………….
दरम्यान संस्था पदाधिकारी आनंद कासार्डेकर,विद्यालयाचे पर्यवेक्षक एन.सी.कुचेकर, शिक्षक सौ.रजनी कासार्डेकर, पांडुरंग काळे, दत्तात्रय मारकड,सौ.सुनिता कांबळे,सौ.सविता पाटील,
प्रियंका नागावकर यांनी तर विद्यार्थ्यांतर्फे युवराज राठोड,कु.शिल्पा शेगावे,कु.सानिका कुलकर्णी,
कु.दिव्यानी लाड,
कु.प्रितिका चौगुले आदी विद्यार्थ्यांनी सेवानिवृत्त प्राचार्य राजेंद्र नारकर व प्रयोग परिचर सहदेव गोसावी यांच्या विविध पैलूंवर प्रकाशझोत टाकत त्यांच्या अनेक आठवणी जागृत केल्या व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

*संस्थेच्या उत्तम सहकार्यामुळेच उत्कृष्ट कार्य :* *राजेंद्र नारकर*

कासार्डे विकास मंडळाच्या सर्व संस्था पदाधिकाऱ्यांच्या बहुमोल मार्गदर्शनामुळे व सर्व मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक शिक्षकेतर बंधु भगिनींच्या उत्तम सहकार्यामुळे मला विविध स्तरावर उत्कृष्ट असे भरीव कार्य करता आले व जिल्हा,राज्य, राष्ट्रीय स्तरावर चमकणारे विद्यार्थी घडविता आल्याची प्रांजळ कबुली सत्कारमुर्ती आर.व्ही. नारकर यांनी दिली.याप्रसंगी सहदेव गोसावी यांनीही मनोगत व्यक्त करताना उत्तम सहकार्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले.
कार्यक्रमा दरम्यान कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष परशुराम माईणकर व इतर संस्था पदाधिकारी यांनी दिलेल्या शुभेच्छांचे वाचन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रामचंद्र राऊळ यांनी तर आभार सौ.भाग्यश्री बिसुरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!