*कोकण Express*
*रसायनशास्त्र विभागाने दिले फिनाईल बनविण्याचे प्रशिक्षषण*
*सौ शुभदादेवी खेमसावंत भोसले यांच्या हस्ते शुभारंभ*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीच्या रसायनशास्त्र विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी फिनाईल बनवण्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्यात आले व फिनाईल बनवण्यात आले या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ शुभदादेवी खेमसावंत भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे कार्यकारिणी सदस्य श्री जयप्रकाश सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एल भारमल ,रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. जी एम शिरोडकर ,रसायनशास्त्र पदव्युत्तर विभागाचे समन्वयक प्रा. डी .डी . गोडकर, रसायनशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते
गेली अनेक वर्षे हा फिनाईल बनवण्याचा उपक्रम चालू आहे यामुळे काही मुलांनी फिनाईल बनवण्याचा आपला व्यवसाय सुरू केला आहे रसायनशास्त्र विभागाच्या उपक्रमातून मिळालेल्या फायदा गरीब मुलांना शिक्षणासाठी केम फंडच्या माध्यमातून दिला जातो असे रसायनशास्त्र विभागप्रमुख प्राध्यापक जीएम शिरोडकर यांनी सांगितले.