*कोकण Express*
*कुसुर येथे मंदिरातील दोन दानपेट्या अज्ञात चोरट्यांनी फोडल्या ; रोखड लंपास*
तालुक्यात चोरट्यांनी पुन्हा एकदा मंदिरांना लक्ष्य केले आहे. कुसुर येथील श्री. रामेश्वर दारुबाई मंदिरात चोरी झाली आहे. मंदिरातील दोन दानपेट्या अज्ञात चोरट्यांनी फोडल्या आहेत. सकाळी ग्रामस्थ मंदिरात दर्शनासाठी आले असताना चोरी झाल्याचे निदर्शनास आले.
कुसूर येथील रामेश्वर मंदिरातील दानपेट्या चोरट्यांनी फोडल्या आहेत. त्यामध्ये रामेश्वराच्या गाभा-यासमोरील पेटीचा मागील भाग तोडून त्यातील रक्कम काढली. तसेच दारुबाईच्या समोरील संपुर्ण पेटीच उखडून काढली. त्यातील रक्कम काढून घेऊन ती मंदिराच्या मागच्या बाजूला टाकली आहे. मंदिरात झालेल्या चोरीची माहिती पोलीस पाटील रवींद्र साळुंखे यांनी पोलिसांना दिली आहे. मंदिरातील चोरीच्या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.