*कोकण Express*
*अन्यथा ठेकेदार व अधिकारी पैसे लाटणार:परशुराम उपरकर*
*जिल्ह्यात निधीची कमतरता असताना केवळ घोषणाबाजी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
मुळात शासनाकडे निधीची कमतरता आहे.मात्र शेवटच्या टप्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासकामांच्या निविदा प्रसिध्द होत आहेत.निविदा आता प्रसिद्ध होतात तर काम कधी होणार हा प्रश्न आहे. त्यामुळे अधिकारी काम न होताच बोगस कामे केली जाण्याची भीती आहे. लोकप्रतिनिधी बेनामी ठेकेदारी करत आहेत.त्यामुळे लोकांनी दक्ष राहून होत असलेल्या विकास कामांवर लक्ष ठेवला पाहिजे,अन्यथा ठेकेदार व अधिकारी पैसे लाटण्याची भीती आहे,असा आरोप मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला. कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मार्च अखेर काळात विकास कामांच्या जाहिराती येत आहे.त्या कामांमध्ये दुरुस्ती व अन्य कामांच्या आहेत.यावरुन शासनाकडे पैसे नाहीत,हे दिसत आहे,आता छोट्या कामांच्या जाहिरात येत आहेत. नागरिकांनी आता या विकास कामांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.अधिकारी व ठेकेदार पैसे लाटण्याचा शक्यता असल्याचा आरोप मनसे नेते परशुराम उपरकर यांनी केला. तळाशील,तोंडवली गावातील लोकांनी रस्त्याच्या कामाबद्दल आंदोलन केले.त्यामुळेच अधिकाऱ्यांनी चुकीचे काम झाल्याची कबुली दिली आहे.
नागरिकांनी राजकीय दबाव न आणता ठेकेदाराकडून काम दर्जेदार करुन घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.आता ही जाहिरात केलेली कामे होतील की नाही?याबद्दल शंका असल्याचे परशुराम उपरकर यांनी व्यक्त केली. दोडामार्गमध्ये १० कोटी कामावरुन संघर्ष झाला.त्यावेळी आमदारांच्या सांगण्यावरून जे ठेकेदार स्वतःहून पुढाकार घेत खड्डे भरण्याचे काम केले.मात्र प्रमुख काम अद्याप झालेले नाही.सिंधुदुर्ग जिल्ह्यात खासदार, आमदार पालकमंत्री केवळ भूमिपूजन करताहेत.काम होत नाहीत, जनतेनी ती कामे करुन घेतली पाहिजेत,असे श्री.उपरकर यांनी सांगितले. मालवणच्या आमदारांनी ५० लाखाची नळ योजना प्रस्ताव सादर करण्यात येणार असे सांगितले. मुळात मालवण शहरातील नळयोजना वायरी,तारकर्ली नेण्यासाठी आश्वासन दिले होते.तो प्रस्ताव आद्यपही तसाच आहे.शासनाकडे पैसे नाहीत.तरीही लोकप्रतिनिधी फसवतात, आता जनतेने आवाज उठवला पाहिजे,असे आवाहन परशुराम उपरकर यांनी केले आहे.