असलदे ग्रामपंचायतीच्या वतीने महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम

असलदे ग्रामपंचायतीच्या वतीने महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम

*कोकण  Express*

*असलदे ग्रामपंचायतीच्या वतीने महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम*

*नांदगाव ः  प्रतिनिधी*

कणकवली तालुक्यातील असलदे ग्रामपंचायतीच्या वतीने जागतीक महिला दिनानिमीत्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम पुढील प्रमाणे – सोमवार दिनांक 7 मार्च, 2022 रोजी सकाळी 9 ते 12 पर्यंत मोफत डोळेतपासणी शिबिर, रांगोळी स्पर्धा, दुपारी 12 ते 1 पाककला स्पर्धा. (पाककलेत महिलांनी घरूनच पदार्थ तयार करून आणायचे आहेत.)

मंगळवार दिनांक 8 मार्च, 2022 रोजी सकाळी 9 ते 10 महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा, 11 वा. विविध स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ, 11 ते 2 पर्यंत हळदीकुंकू समारंभ होवून कार्यक्रमांची सांगता होईल. तरी त्वरीत स्पर्धेसाठी नाव नोंदणी करून स्पर्धा यशस्वी करावी, असे आवाहन सरपंच पंढरी वायंगणकर, उपसरपंच संतोष परब, ग्रामसेवक आर. डी. सावंत व सर्व सदस्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!