*कोकण Express*
*ज्येष्ठ नागरिक संघातर्फे कसालमध्ये जागतिक महिला दिनाचे आयोजन*
*कसाल ः प्रतिनिधी*
जागतिक महिला दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा संघ शाखा कसाल तर्फे महिला दिनाचे आयोजन मंगळवार 8 मार्च रोजी कसाल ग्रामपंचायतीच्या सभागृहामध्ये केले आहे. सकाळी 10 ते दुपारी 11.30 या वेळेमध्ये कोविड महामारीच्या सर्व नियमांचे पालन करून महिलांचा सत्कार व सन्मान करण्यात येणार आहे सेवा संघाच्या सर्व सभासदांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन सेवा संघाचे सचिव श्रीधर मेस्त्री खजिनदार पांडुरंग सावंत यांनी केले आहे.