*कोकण Express*
*फिरकीचा महान जादुगार हरपला*
*ऑस्ट्रेलियन महान स्पिनर शेन वॉर्न यांचे निधन*
*मुंबई :*
क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन महान स्पिनर शेन वॉर्न यांचे निधन झालं आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. वयाच्या ५२ व्या वर्षी शेन वॉर्न हृदयविकाराने निधन झालं. शेन वॉर्नने टेस्ट क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून सर्वात जास्त गडी बाद करण्याचा विक्रम केला असून कसोटीमध्ये १४५ सामने आणि ७०८ विकेट तसेच एकदिवसीय सामन्यात २९३ विकेट विकेट घेतल्या आहेत.