६ मार्च रोजी घोटगे येथे मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन

६ मार्च रोजी घोटगे येथे मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन

*कोकण Express*

*६ मार्च रोजी घोटगे येथे मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

जिल्हा परिषद आरोग्य विभाग सिंधुदुर्ग व साईलीला हॉस्पिटल नाटळ यांच्या संयुक्त विद्यमाने घोटगे येथे आयोजित मोफत सर्व रोग निदान शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन जि.प. सदस्य लॉरेन्स मान्येकर यांनी केले आहे.
जि. प . सदस्य लॉरेन्स मान्येकर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद (आरोग्य विभाग) सिंधुदुर्ग व साईलीला हॉस्पिटल नाटळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.६ मार्च रोजी सकाळी ९:३० वाजल्यापासून जि. प. पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा घोटगे नं.१ येथे निःशुल्क सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याआरोग्य शिबिराचे उद्घाटन जि. प.सिंधुदुर्गच्या अध्यक्षा सौ.संजना सावंत यांच्या हस्ते होणार आहे. तसेच शिक्षण व आरोग्य सभापती सौ अनिषा दळवी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, कुडाळ पं स.सदस्य बाळकृष्ण मडव, पंचक्रोशीतील सरपंच अमोल तेली, उत्तम बांदेकर, सौ.अर्चना मडव, सौ. प्रिया परब, दिलीप तवटे आदी उपस्थित राहणार आहेत.
सदर शिबिर हे सर्व वयोगटासाठी असून यात सर्वसाधारण मोफत आरोग्य तपासणी, मोफत रक्त चाचण्या, मोफत नेत्र तपासणी केली जाणार आहे. या शिबिरात मधुमेह तज्ञ डॉ. सुनील इनामदार, स्त्री रोग तज्ञ डॉ.नित्यानंद मसुरकर, फिजिशियन डॉ. खडतरे, अस्थिरोग तज्ञ डॉ. चव्हाण, जनरल फिजिशियन डॉ.अनिल पवार व डॉक्टर चंदनशिव आदी विशेष डॉक्टर सहभागी असणार आहेत. तरी जांभवडे पंचक्रोशीतील सर्व गावांतील ग्रामस्थांनी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये व आपल्या गावच्या आरोग्यसेविका यांच्याशी संपर्क साधावा. तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिरासाठी येताना आपल्या जुन्या रिपोर्ट सह वेळेत उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा आवाहन जि.प .सदस्य लॉरेन्स मान्येकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!