*कोकण Express*
*तालुक्यातील 57 ग्रामपंचायतींच्या निवडणुकी करिता करण्यात आली आहे प्रारूप प्रभाग रचना*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील 57 ग्रामपंचायतींच्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती नोंदविण्यासाठी 4 मार्च ही अंतिम मुदत देण्यात आली होती. आज 4 मार्च रोजी सायंकाळी पर्यंत तालुकास्तरीय प्रभाग रचना समिती कडे एकूण 8 गावांमधील 16 हरकती प्राप्त झाल्या. या हरकती नुसार यासंदर्भात सुनावणी घेऊन त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. प्राप्त झालेल्या सूचना व हरकती 7 मार्च पर्यत उपविभागीय अधिकारी महसूल यांच्याकडे पाठविण्यात येणार आहेत. या प्राप्त झालेल्या हरकती मध्ये साकेडी 1, ओसरगाव 1, जानवली 2, कळसुली 1, वागदे 8, नाटळ 1, तिवरे 1, शिवडाव 1 अशा एकूण 16 हरकती तालुकास्तरीय प्रभाग रचना समितीकडे प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त झालेल्या सूचना व हरकती वर 15 मार्च रोजी उपविभागीय अधिकाऱ्यां मार्फत सुनावणी घेण्यात येणार आहे. आलेल्या सर्व सूचना व हरकती वरील आपला अभिप्राय नोंदवून त्या अतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकार्यांकडे 21 मार्चपर्यंत पाठविण्यात येणार आहेत. तसेच 25 मार्च पर्यंत उपविभागीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले प्रस्ताव तपासून जिल्हाधिकाऱ्यांनी प्रभाग सीमा दर्शविणाऱ्या अंतिम अधिसूचनेला ला मान्यता देऊन त्यावर स्वाक्षरी करण्यात येणार आहे. व त्यानंतर 29 मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिलेली अंतिम अधिसूचना प्रसिद्धी देण्यात येणार आहे.