*कोकण Express*
*तळेरेत मराठी राजभाषा दिना निमित्त : वकृत्व स्पर्धेचे आयोजन*
*स्पर्धेत स्वरा चिके, दीपेश पाष्टे, इशा सावंत विजेते*
*कासार्डे ः संजय भोसले*
तळेरे येथील स्व. सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालयच्यावतीने मराठी राजभाषा गौरव दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त शालेय मुलांसाठी वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये स्वरा चिके, दीपेश पाष्टे, इशा सावंत यांनी विविध गटातून प्रथम क्रमांक मिळविला.
या स्पर्धेचे उद्घाटन वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत वरुणकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी तळेरे जिल्हा परिषद नं. 1 च्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश जाधव, वाचनालयाचे अध्यक्ष विनय पावसकर, उपाध्यक्ष राजू वळंजू, सचिव मिनेश तळेकर, सदस्य डॉ. अभिजित कणसे, स्पर्धेचे परीक्षक विजय पाताडे, प्रमोद कोयंडे, ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर, सौ. श्रावणी मदभावे, उदय दुदवडकर, वर्षा केसरकर आदी उपस्थित होते.
मराठी राजभाषा दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांची तीन गटात वत्कृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत 72 मुलांनी सहभाग घेतला होता. विषय ऐच्छिक असल्याने मुलांनी अगदी चालू सामाजिक विषयासह, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विषय अगदी अभ्यासपूर्ण मांडले.
या स्पर्धेचा निकाल पुढिलप्रमाणे:
गट क्रमांक 1 (इ. 2 री ते 4 थी) – प्रथम क्रमांक स्वरा रवींद्र चिके (जिल्हा परिषद शाळा साळिस्ते), द्वितीय क्रमांक तेजम विनायक डोंगरे (जिल्हा परिषद शाळा तळेरे नं. 1), तृतीय क्रमांक श्रीकृष्ण मंगेश दहिफळे, प्रत्युष मिलिंद पाताडे (दोघेही जिल्हा परिषद शाळा तळेरे नं. 1) तर उत्तेजनार्थ सावी वैभव मुद्राळे, आदित्य राजीव बिरादार (जिल्हा परिषद शाळा तळेरे नं. 1) हे विजेते ठरले आहेत.
गट क्रमांक 2 (इ. 5 वी ते 7 वी) – प्रथम क्रमांक दीपेश संतोष पाष्टे (जिल्हा परिषद शाळा साळिस्ते), द्वितीय क्रमांक तनिषा दिलीप पालव (जिल्हा परिषद शाळा तळेरे नं. 1), तृतीय क्रमांक दुर्वा प्रकाश पाटिल (जिल्हा परिषद शाळा तळेरे नं. 1) तर उत्तेजनार्थ सानिका सुरेश खराटे, प्रांजल गणेश साटम (जिल्हा परिषद शाळा तळेरे नं. 1) हे विजेते ठरले.
गट क्रमांक 3 (इ. 8 वी ते 10 वी) – प्रथम क्रमांक इशा जयराम सावंत (वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय तळेरे), द्वितीय क्रमांक स्नेहल संतोष ताम्हणकर (शेठ म. वि. केसरकर माध्यमिक विद्यालय वारगाव), तृतीय क्रमांक कौस्तुभ संतोष तेरवणकर (वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय तळेरे) तर उत्तेजनार्थ चौताली प्रशांत तळेकर व रिया गंगाराम राठोड़ (दोघीही वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय तळेरे) हे विजेते ठरले.
या स्पर्धेचे परिक्षण विजय पाताडे, राजेश जाधव, प्रमोद कोयंडे, बिरादार यांनी केले
या सर्व विजेत्या मुलांना जागतिक महिला दिनानिमीत्त आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा केसरकर हिने तर प्रस्तावना व आभार विनय पावसकर यांनी मानले.

