*कोकण Express*
*आदिवासी – कातकऱ्यां संदर्भात “ती” बैठक असबंधीत लोकांशी*
*अखंड लोकमंच चे नामानंद मोडक यांची तक्रार*
*कातकऱ्यांच्या प्रश्ना बाबत स्वतंत्र बैठक घेण्याची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
3 मार्च रोजी कातकऱ्यां संदर्भात आयोजित केलेली बैठक असंबंधित लोकांशी आहे. त्यातील बहूतेकांना आम्ही ओळखतही नाही. तसेच आमचा त्यांच्याशी काडिचाही संबंध नाही. आम्ही गेली १८ वर्ष अखंड लोकमंच या संस्थेच्या माध्यमातून संघटित होत आमच्या न्याय्य हक्कांसाठी लढत आहोत. सोबत सामाजिक , सांस्कृतिक , शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी एकत्रित काम करत असल्यामूळे आम्हाला स्वतंत्र वेळ देवून कातकऱ्यांच्या प्रश्नां बाबत बैठक आयोजित करावी अशी मागणी अखंड लोकमंच चे नामानंद मोडक यांच्या सह अन्य संघटना पदाधिकारी व कातकरी बांधवांनी प्रांताधिकारी याच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे, की 21 फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष भेटीत निवेदन देवून विनंती केली होती की आपण किंवा आपले संबंधित अधिकारी यांची आदिवासी सोबत एक बैठक आयोजित करून त्यांच्या मागण्या व समस्या समजून घेऊनच पुनर्वसनाचा निर्णय घ्यावा. या निवेदनावर अखंड लोकमंच प्रमुख व श्रमिक मुक्तीवेध चे बबन पवार, शांताराम पवार, संदीप निकम यांच्यासह 28 आदिवासी बांधवांचे मागणी पत्र प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. तसेच या बाबत आज गुरुवारी प्रांताधिकारी यांची भेट घेत त्याचे या प्रश्नी लक्ष देखील वेधण्यात आले आहे.

