*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या कार्यकारिणीची ५ मार्चला कुडाळात बैठक…*
*बाळा गावडेंची माहिती; पदाधिकारी,कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन…*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक ५ मार्चला कुडाळ येथे आयोजित करण्यात आली आहे. ही सभा सकाळी दहा वाजता येथील गुलमोहर हॉलमध्ये होणार आहे. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा महाराष्ट्र राज्याचे सहप्रभारी बी. एम.संदीप हे आढावा घेणार आहेत. याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी विनायक देशमुख व सहप्रभारी शशांक बावस्कर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, सर्व तालुका अध्यक्षांनी आपल्या तालुक्यात डिजिटल सभासद नोंदणीसाठी नेमलेल्या नोंदणी कर्त्यांना व तालुका कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन या बैठकीत उपस्थित राहावे.या सभेमध्ये डिजिटल सभासद नोंदणी,येणाऱ्या जिल्हा परिषद आणि नगरपालिका यांच्या निवडणुकांचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांनी उपस्थित राहावे, असे श्री गावडे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.