कणकवली तालुका युवा सेना समन्वयक पदी तेजस राणे तर आदित्य सापळे कणकवली युवासेना शहरप्रमुख

कणकवली तालुका युवा सेना समन्वयक पदी तेजस राणे तर आदित्य सापळे कणकवली युवासेना शहरप्रमुख

*कोकण Express*

*कणकवली तालुका युवा सेना समन्वयक पदी तेजस राणे तर आदित्य सापळे कणकवली युवासेना शहरप्रमुख*

*युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली नियुक्त जाहिर*

कणकवली तालुका युवा सेना समन्वयक पदी तेजस राणे यांना बढती देण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी कणकवली शहर प्रमुखपदी आदित्य सापळे यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. तर युवा सेना उपशहरप्रमुख पदी सोहम वाळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार खासदार विनायक राऊत, युवसेना सचिव वरून सर देसाई, आमदार वैभव नाईक, दीपक केसरकर व जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी या नियुक्त्या जाहीर केली आहे. सुशांत नाईक यांनी युवा सेना जिल्हाप्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर संघटनेत पदाधिकारी बदल व नव्याने नियुक्ती यांवर भर देण्यात आला आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे शिवसेने च्या नेते व पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!