*कोकण Express*
*ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या मराठी भाषेचा सर्वाधिक बोली भाषेत वापर व्हावा—प्रा. प्रशांत हटकर*
*तळेरे ः संजय भोसले*
मराठी अतिप्राचीन भाषा आहे. या भाषेला ऐतिहासिक पार्श्वभूमी खुपच चांगली आहे. त्यामुळे ही भाषा टिकण्यासाठी जास्तीत जास्त बोलली गेली पाहिजे, असे प्रतिपादन विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाचे प्रा. प्रशांत हटकर यांनी मत व्यक्त केले. तळेरे येथील प्रज्ञांगण मध्ये आयोजित केलेल्या मराठी राजभाषा दिवस कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर अभिनेते लेखक प्रमोद कोयंडे, चित्रकार उदय दुदवडकर, तंबाखु प्रतिबंध अभियानच्या संचालिका सौ. श्रावणी मदभावे, संदीप साटम, सरस्वती पाटिल, श्रावणी कम्प्युटरचे संचालक सतिश मदभावे, चित्रकार अक्षय मेस्त्री आदी उपस्थित होते. कार्यक्रामाच्या सुरुवातीला वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन झाली.
यावेळी बोलताना प्रा. प्रशांत हटकर म्हणाले की, इंग्रजीतील काही शब्द अगदी सहज मराठीमध्ये वापरु लागल्याने इंग्रजी शब्दांचा जास्त वापर होऊ लागला. यासाठी आपण उत्तमोत्तम मराठीतील चांगले शब्द वापरले पाहिजेत. आपली बोली भाषा बोलली पाहिजे. तरच ती जीवंत राहिल आणि वाचेलही. तर उदय दुदवडकर म्हणाले की, इंग्रजी भाषेतील काही शब्दांचा मराठीमध्ये आपण करत असलेला वापर कमी केला पाहिजे. इंग्रजी शब्दांना आपण मराठीमध्ये प्रतिशब्द शोधले पाहिजेत किंवा शब्द निर्माण केले पाहिजेत. तरच आपली मातृभाषा जीवंत राहिल. तर श्रावणी मदभावे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची स्वराज्यातून दिलेला आजच्या युवकांना संदेश याबाबत विस्तृत माहिती दिली. तसेच, केवळ दिन साजरे न करता ही लढाई पुन्हा एकदा एकत्रित हातात हात घालून लढूया, असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रणाली मांजरेकर हिने केले. तर उपस्थितांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.