*कोकण Express*
*खानोली-सुरंगपाणी विठ्ठल पंचायतनाचा 28 वा वर्धापन दिन दि। 14 व 15 रोजी विविधांगी कार्यक्रमाने संपन्न होणार*
*विविध 40 प्रकारच्या फळांच्या नैवेद्याचे खास आकर्षण*
*वेंगुर्ले ःःप्रतिनिधी*
खानोली सुरंगपाणी येथील श्री विठ्ठल पंचायतन देवस्थान मधील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा 28 वर्धापन दिन सोहळा दिनांक सोमवार दिनांक 14 मार्च फाल्गुन शुद्ध आमलकी एकादशी व मंगळवार दि. 15 मार्च रोजी व्दादशी या दोन दिवसांत विविध धार्मिक आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने संपन्न होत आहे.
त्यानिमित्त सोमवार दि. 14 मार्च रोजी सकाळी 9 वाजता आवळीवृक्षाचे पूजन, सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत नामवंत बुवांचे चक्रीकीर्तन, दुपारी 1:30 वाजता आरती तीर्थप्रसाद अल्पोपहार, सायंकाळी 7:30 वाजता धुपारती पालखी प्रदक्षिणा, सायंकाळी 7 वाजता दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळ, सिंधुदुर्ग यांचा दशावतारी नाट्यप्रयोग मंगळवार दि. 15 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत श्री चा नामघोष श्री गुरुव्यासांची पुन:प्रतिष्ठापना, दुपारी 1 वाजता आरती, तीर्थप्रसाद, पालखी प्रदक्षिणा, दुपारी 1:30 ते 4 वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम, सायंकाळी 4:30 वाजता परमपूज्य दादा पंडित महाराज यांचा
विठ्ठल पंचायतनाची निर्मिती व अध्यात्मिक प्रबोधनातून जनतेस मार्गदर्शन यावर माहिती देणारा कार्यक्रम, सायंकाळी 7 वाजता भोईचे केरवडे येथील स्वरसाधना संगीत मैफिल, रात्री 8 वाजता श्री सद्गुरू प्रासादिक भजन मंडळ कुडाळ यांचा भजनाचा कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
खानोली सुरंगपाणी येथील श्री विठ्ठल पंचायतन देवस्थानच्या 28 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून खास 33 कोटी देवता व 7 सप्तर्षी अशा 40 जणांना विविध प्रकारच्या 40 फळांचा नेवेद्य दाखविण्याचा विशेष आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. असा हा आगळावेगळा सोहळा सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच खानोली सुरंगपाणी येथील धर्मस्थानावर संपन्न होत आहे.
या वर्धापन दिन सोहळ्यात आयोजित केलेल्या धार्मिक, अध्यात्मिक व सांस्कृतिक अशा सर्व कार्यक्रमांचा लाभ भाविक व रसिकांनी बहुसंख्येने घ्यावा असे आवाहन श्री विठ्ठल पंचायतन देवस्थानचे व्यवस्थापक दादा पंडित महाराज यांनी केले आहे.