*कोकण Express*
*कणकवलीत ८ मार्च रोजी भरणार “पदर प्रतिष्ठान”चा महामेळा*
*महिलांसाठी खास “होम मिनिस्टर” स्पर्धा, आरोग्य शिबीर व मोफत शस्त्रक्रिया होणार*
*नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती*
*कणकवली ः प्रतिनिधी*
८ मार्चला महिला दिनाचे औचित्य साधून कणकवली शहरात ” पदर प्रतिष्ठान” स्थापन केले आहे. या प्रतिष्ठानचा शुभारंभ ८ मार्च रोजी करण्यात येणार आहे. हे प्रतिष्ठान नोंदणीकृत आहे. ‘पदर प्रतिष्ठान’ स्थापन करण्यामागे महिला सन्मान, महिला सक्षमीकरण व निर्भीड असायला पाहिजे, या हेतूने केलेलं आहे. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आरोग्य, कला, क्रीडा, उद्योग या क्षेत्रात काम करणार आहे. या पदर प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी मेघा गांगण यांची निवड केली आहे. या प्रतिष्ठानचा शुभारंभ नीलम राणे यांच्या हस्ते ८ मार्चला होणार आहे. तर प्रमुख उपस्थिती नंदिता नितेश राणे यांची असणार असे अशी माहिती या प्रतिष्ठानचे संस्थापक तथा नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. यावेळी अध्यक्षा मेघा गांगण, उपाध्यक्ष हर्षदा गवाणकर, सचिव मीरा कवडे, खजिनदार सुप्रिया नलावडे, सदस्य संजीवनी पवार, दिशा अंधारी, अंकिता कर्पे, साक्षी वाळके, विनिता राणे आदी महिला उपस्थित होत्या.
महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा विद्यामंदिर पटांगणावर आयोजित केली आहे.पहिले पारितोषिक १७० लिटर फ्रीज, द्वितीय पारितोषिक वॉशिंग मशीन, तृतीय पारितोषिक कुलर व चौथे, पाचवे बक्षीस मिक्सर असणार आहे. ज्या महिला सहभाग घेतील, त्या प्रत्येक महिलेला एक आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे. ज्या प्रेक्षकांना भव्य लकी ड्रॉ ठेवण्यात आलं आहे. २५ आकर्षक बक्षिसे ठेवली आहेत,असे समीर नलावडे यांनी सांगितले.
पदर प्रतिष्ठान नूतन कार्यकारिणी
अध्यक्षा- मेघा गांगण, उपाध्यक्ष- हर्षदा गवाणकर, सचिव- मीरा कवडे, खजिनदार- सुप्रिया नलावडे, सदस्य-संजीवनी पवार, दिशा अंधारी, अंकिता कर्पे, साक्षी वाळके, विनिता राणे, दिशा अंधारी, सल्लागार दोन नगरसेविका कविता राणे, प्रतिक्षा सावंत, मेघा सावंत, वर्षा बांदेकर आहेत. आतापर्यंत कणकवली शहरात ३०० महिला नोंदणी झाली आहे. येणाऱ्या काळात १ हजार महिला जोडल्या जाणार आहेत. त्या महिलाना ओळखपत्र दिले जाणार असल्याचे समीर नलावडे यांनी सांगितले.
८ मार्चला सकाळच्या सत्रात आरोग्य शिबिर घेत आहोत. एसएसपीएम हॉस्पिटल व पदर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आरोग्य शिबीर घेतलं जाणार आहे. स्तन कॅन्सर ,गर्भाशय आजार, अस्थिरोग व महिलांच्या आजारांची तपासणी होणार आहे. त्या महिलांवर मोफत ऑपरेशन केलं जाणार आहे. या तपासणी साठी ४ डॉक्टर आहेत. त्यात डॉ.पालेकर, डॉ. गोपाळ, एमडी सर्जन डॉ. मेरठ येणार आहेत. तसेच ८ जणांचे कर्मचारी पथक असणार आहे, असे समीर नलावडे यांनी सांगितले.

