*कोकण Express*
*कुडाळ तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतीच्या प्रारुप प्रभाग रचना जाहीर*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतीच्या प्रारुप प्रभाग रचना नकाशे जाहीर झाले असून ४ मार्च म्हणजे शुक्रवारपर्यंत याबाबत हरकती नोंदवाव्यात असे आवाहन कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांनी केलंय. कुडाळ तालुक्यातील प्रारुप प्रभाग रचना जाहीर झालेल्या ५४ ग्रामपंचायतींमध्ये हिर्लोक, ओरोस बु., तुळसुली तर्फ माणगांव, केरवडे तर्फमाणगांव, मांडकुली, बिबवणे, तेर्से बांबर्डे, कवठी, वाडीवरवडे, सोनवडे तर्फ हवेली, साळगाव, झाराप, आंब्रड, पिंगुळी, पुळास, कडावल, हुमरस, शिवापूर, निवजे, भरणी, सोनवडे तर्फ कळसुली, बांबुळी, कसाल, घावनळे, नारूर, पावशी, नेरूर, रानबांबुळी, गावराई, आंदुर्ले, चेंदवण, सरंबळ, वेताळ बांबर्डे, परबवाडा पाट, बाव, डिगस, आवळेगाव, ओरोस खुर्द, मुळदे, नेरूर-देऊळवाडा, कालेली, माणगांव, तेंडोली, केरवडे, जांभवडे, पांग्रड, घोटगे, नानेली, आंबडपाल, निरुखे, पडवे, पणदूर, तुळसुली, अणाव या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तरी प्रारुप प्रभाग रचनेबाबत हरकती असल्यास नागरिकांनी ४ मार्चपर्यंत हरकती नोंदवाव्यात असे आवाहन तहसीलदार अमोल पाठक यांनी केलंय.

