*कोकण Express*
*भारतीय बौद्धमहासभा सिंधुदुर्ग च्या वतीने धम्म विधिकर्ता प्रशिक्षण शिबीराचे ०६ मार्च आयोजन*
*कासार्डे ः संजय भोसले*
भारतीय बौद्ध महासभा शाखा सिंधुदुर्ग यांच्या वतीने रविवार दिनांक ०६ मार्च २०२२ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ०४ या वेळेत सिंधुदुर्गातील बौद्ध बांधवांसाठी धम्म विधी कार्यकर्ता प्रशिक्षण , जिल्हापरिषद ,आरोग्य सेवक पतपेढी हॉल ओरोस. येथे आयोजित केले असून धम्म विधी कशा प्रकारे पार पाडाव्यात हे सविस्तर समजावून सांगितले जाणार आहे. तसेच विधीमध्ये सर्वत्रच एक सूत्रता कशी येईल याविषयीचे सखोल मार्गदर्शनही तज्ञांच्या वतीने करण्यात येणार आहे.

या धम्म विधी करीता प्रशिक्षणासाठी नाममात्र शुल्क रुपये २००/— आकारले असून यामध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, उपस्थिती प्रमाणपत्र आणि ओळख पत्र देण्यात येणार आहे. तसेच कोवीड-19 च्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. तरी इच्छुक बौद्ध बांधवांनी शुक्रवार दिनांक ०४मार्च २०२२ रोजी पर्यंत जिल्हा संस्कार प्रमुख सिताराम सोनवडेकर मोबाईल नं. 94 04 43 95 79, महासचिव अशोक कांबळे मोबाईल नं.94 21 03 88 15 या क्रमांकाची संपर्क साधून आपली नाव नोंदणी करावी असे आवाहन संस्थेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष विद्याधर कदम यांनी केले आहे .

