*कोकण Express*
*आदर्श शिक्षक असलेले श्री सुभाष लोकरे यांच्या सेवानिवृत्ती पर सिंधुरत्न फाऊंडेशन च्या वतीने सत्कार*
*कणकवली ःःप्रतिनिधी*
कणकवली-शहरातील आदर्श शिक्षक म्हणुन नावलौकिक असलेले भालचंद्र महाराज जि.प.शाळा कणकवली क्र.३चे मुख्याध्यापक सुभाष लोकरे नुकतेच सेवा निवृत झाले.सुभाष लोकरे सरांनी आपल्या कार्यकुशलतेच्या जोरावर कार्यदक्ष राहुन शाळेसाठी अविरत मेहनत घेऊन भालचंद्र महाराज जि.प.शाळा कणकवली क्र.३सिंधुदुर्ग जिल्हात अव्वल स्थानावर नेऊन ठेवल आहे , सुभाष लोकरे सर म्हणजे मित भाषी , क्रीयाशील,कर्तव्यदक्ष, कर्तव्यनिष्ठ,सदा बहार हसतमुख चेहरा अशी त्यांची ख्याती आहे ,त्यांच्या सेवेच्या कारकिर्दीत बरेच विध्यार्थी मेरिट मध्ये आले आहेत ,यावेळी त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून सिंधुरत्न फाऊंडेशन महाराष्ट्र च्या अध्यक्षा अभिनेत्री सौ अक्षता कंबळी यांनी त्यांच्या निवास स्थानी जाऊन शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सहपत्नीक यथोचित्त सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी सिद्धेश कांबळी ,अनुज कांबळी उपस्थित होते.