*कोकण Express*
*युवा चित्रकार अक्षय मेस्त्री याला राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार*
*मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले*
*कासार्डे ः संजय भोसले*
देवगड तालुक्यातील गवाणे येथील युवा चित्रकार अक्षय मेस्त्री यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार देऊन मुंबई येथे गौरविण्यात आले. कला क्षेत्रातील विविध उपक्रमांची दखल घेऊन त्याला हा पुरस्कार देण्यात आला. याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
नवी मुंबई येथील कलासाधना सामाजिक संस्थेच्यावतीने कला क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करनार्या कलावंताला पुरस्कार देऊन त्यान्च्या कामाचा गौरव केला जातो. यावर्षी राज्यातील विविध भागातील चित्रकार आणि कलाकार यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी आंतरराष्ट्रीय कीर्तिचे वास्तूतज्ञ डॉ. रविराज अहिरराव, सुप्रसिध्द गायक नंदेश उमप, कर्करोग तज्ञ डॉ. अमजद खान असद खान पठाण, शिक्षण उपसंचालक सुरेश माळी, संस्था अध्यक्षा सौ. मेघा महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन पुढिल कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
अक्षय मेस्त्री हा आपल्या कलेद्वारे विविध सामाजिक प्रश्नांवर प्रबोधन करतो. त्याच्या अनेक उपक्रमांना सामाजिक किनार असते. त्यामुळे त्याची कलाकृती लोकप्रीय होते. गवाणेसारख्या ग्रामीण भागात राहूनही त्याने सामाजिकतेचे व्रत कलेद्वारे अत्यंत निष्ठेने जोपासले आहे. यापूर्वी त्याच्या चित्रांचे अनेक ठिकाणी प्रदर्शने लागली असुन विविध पुरस्कारांनी त्याला गौरविण्यात आले आहे. अशा पुरस्कारांनी कामाला अजून प्रोत्साहन मिळते, अधिकाधिक काम करण्यासाठी बळ मिळत असल्याची भावना अक्षय मेस्त्री याने बोलून दाखवली.