मंजुरी नसतानाच कामाचे पालकमंत्र्यानी भूमिपूजन केले हे मान्य केल्याबद्दल कन्हैया पारकर यांचे अभिनंदन!

मंजुरी नसतानाच कामाचे पालकमंत्र्यानी भूमिपूजन केले हे मान्य केल्याबद्दल कन्हैया पारकर यांचे अभिनंदन!

*कोकण  Express*

*मंजुरी नसतानाच कामाचे पालकमंत्र्यानी भूमिपूजन केले हे मान्य केल्याबद्दल कन्हैया पारकर यांचे अभिनंदन!*

*घराकडच्या गटाराला आणला तसा वैभव नाईक यांनी गार्डनच्या कामाला निधी आणण्याची गरज होती*

*नगरसेवक शिशीर परुळेकर यांचे कन्हैया पारकर यांना प्रत्युत्तर*

*कणकवली ः प्रतिनिधी*

आतापर्यंत कणकवलीतल्या जनतेला चुकीची माहिती देऊन जनतेची दिशाभूल करत आल्यामुळेच नगरसेवक कन्हैया पारकर व त्यांचे बंधू संदेश पारकर यांना जनतेने सातत्याने नाकारत घरी बसवले. श्रीधर नाईक उद्यानाच्या उद्याच्या भूमिपूजना संदर्भात देखील कन्हैया पारकर यांनी पुन्हा एकदा अशी दिशाभूल करणारी माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. मुळात कन्हैया पारकर हे सांगत असलेले श्रीधर नाईक उद्यानाच्या 11 जून च्या मंजूर कामाचे आदेशच नाहीत. प्रत्यक्षात 11 जूनला हे काम मंजूर झालेच नाही. तर 15 नोव्हेंबर 2021 रोजी या कामाला कार्यारंभ आदेश देत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे पालकमंत्री, आमदार वैभव नाईक व खासदार विनायक राऊत यांनी 22 जून 2021 रोजी भूमिपूजन केले हे अनधिकृत व काम प्रत्यक्षात मंजूर नसताना केले हे पारकर यांनी मान्य केल्याबद्दल कन्हैया पारकर यांचे विशेष अभिनंदन!. असा टोला नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी लगावला आहे. राहिला प्रश्न श्रीधर नाईक गार्डनच्या निधी मंजुरीचा. मुळात कणकवली नगरपंचायत च्या सभागृहात सत्ताधारी नगरसेवकांकडून हा ठराव घेण्यात आला. व नगरोत्थान योजनेतून 75 लाखांचा निधी आमच्या मार्फतच मंजूर करण्यात आला. व तो निधी कणकवली नगरपंचायत चे सत्ताधारी म्हणून आम्ही कसा मंजूर करून आणला, त्याची माहिती वैभव नाईक यांनी दिली तर ती कन्हैया पारकर यांनी घ्यावी. मग पालकमंत्र्यांनी निधी मंजूर केला हे पारकर यांचे अज्ञान आपोआप दूर होईल असा टोला देखील श्री परुळेकर यांनी लगावला. 15 नोव्हेंबर ला काम मंजूर आदेश निघण्यापूर्वी पालकमंत्री, वैभव नाईक व विनायक राऊत यांनी कामाचे भूमिपूजन केले. हे पारकर यांनीच मान्य केले. त्यामुळे पालकमंत्री व वैभव नाईक हे केवळ श्रेय घेण्यासाठी काम मंजूर होण्या पूर्वी कामाची भूमिपूजन करतात हे कन्हैया पारकर यांनी मान्य करत पुन्हा एकदा आपण तोंडावर पडण्याची आपली परंपरा कायम ठेवली. व पालक मंत्री व वैभव नाईक यांचे पितळ देखील उघडे केले. आपल्या घराच्या मागील गटाराच्या कामाला ज्या पद्धतीने आमदार वैभव नाईक यांनी 50 लाखांचा निधी मंजूर करून आणला तसा निधी श्रीधर नाईक या गार्डनच्या कामासाठी वैभव नाईक यांनी आणण्याची गरज होती. पण तो त्यानी आणला नाही.11 जून रोजी श्रीधर नाईक गार्डन चे काम मंजूर झालेच नाही हे कागदोपत्री स्पष्ट आहे. याला मंजुरी मिळाली 15 नोव्हेंबर 2021 रोजी. पारकर काम मंजुरी चा दावा करत असलेल्या 11 जून च्या आदेशाची प्रत यांनी कणकवलीतील जनतेसमोर दाखवावी. कणकवली शहरातील जनतेची दिशाभूल करून पालकमंत्री व वैभव नाईक यांच्या प्रमाणेच आपल्याला ही, आम्ही मंजूर करून आणलेल्या कामाचे श्रेय घेता यावे याकरिता पारकर यांचा हा सारा खटाटोप आहे अशी टीका श्री परुळेकर यांनी केली. त्यात करून शिवसेनेत पारकर हे पद मिळत नसल्याने अजूनच अस्वस्थ झाले आहेत. व यामुळेच जनतेची दिशाभूल करणारी माहिती ते देत आहेत. पण कणकवली शहरातील जनता अशी दिशाभूल खपवून घेत नाहीत हे पारकर यांना जनतेने यापूर्वी अनेकदा दाखवून दिले आहे. व यापुढेही दाखवून देईल असा टोला नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!