केंद्र सरकारचा एमएसएमई विभागाचा उद्योजक विकास कार्यक्रम जिल्ह्यातील व्यापारी,नवउद्योजकांसाठी आर्थिक सक्षमता व व्यवसाय वाढीसाठी दिशादर्शक ठरेल

केंद्र सरकारचा एमएसएमई विभागाचा उद्योजक विकास कार्यक्रम जिल्ह्यातील व्यापारी,नवउद्योजकांसाठी आर्थिक सक्षमता व व्यवसाय वाढीसाठी दिशादर्शक ठरेल

*कोकण Express*

*केंद्र सरकारचा एमएसएमई विभागाचा उद्योजक विकास कार्यक्रम जिल्ह्यातील व्यापारी,नवउद्योजकांसाठी आर्थिक सक्षमता व व्यवसाय वाढीसाठी दिशादर्शक ठरेल*

*विष्णू मोंडकर जिल्हाध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग.*

*जिल्ह्यातील महिला बचत गट,व्यापारी,पर्यटन व्यावसायिक ,नवउद्योजक तसेच महासंघाच्या सभासदांनी उपस्थित राहण्याचे महासंघाचे आवाहन.*

सिंधुदुर्ग जिह्यात ओरोस येथे शुक्रवार दिनांक २५/२/२०२२ रोजी १० ते ४ यावेळेत होणाऱ्या शरदकृषी भवन येथे होणाऱ्या एमएसएमई उद्योजगता विकास कार्यक्रम हा जिल्ह्यातील व्यापारी वर्गासाठी दिशादर्शक ठरणारा असून अश्या प्रकारचा केंद्र सरकारच्या माध्यमातून पहिलाच कार्यक्रम सिंधुदुर्ग जिह्यातील व्यापारी वर्गासाठी होत आहे .कोरोना काळानंतर जिल्ह्यातील उध्वस्त झालेल्या व्यापारी वर्गासाठी केंद्र सरकारचे आश्वासक पाऊल या दिशेने या कार्यक्रमाकडे पाहता येईल.सदर विभागाचे ७० पेक्षा जास्त मुख्य अधिकारी उपस्थित राहून उद्योजकांना व्यावसायिक मार्गदर्शन करणार आहेत आतापर्यत एमएसएमई विभागाशी व्यापारी वर्गाचा ऑनलाईन कर्ज प्रकरण करणे एवढाच सहभाग येत होता.उद्या होणाऱ्या कार्यक्रमात उद्योजकांना कर्ज विषयी मार्गदर्शन सबसिडी नाविन्यपूर्ण प्रकल्प विषयी मार्गदर्शन दिले जाणार असून व्यावसायिक वर्गाने एकत्र येऊन कॅस्टर च्या माध्यमातूम रोजगार निर्मिती ,पर्यटन,व्यापारी,महिला बचत गट,नवउद्योजक यांना १० लाख ते २५० कोटी रुपयांपर्यंत कर्जयोजना त्यावर व्यवसाय वाढीसाठी मिळणारे अनुदान याविषयी माहिती दिली जाणार आहे .सदर उद्योजक विकास कार्यक्रम जिल्ह्यातील व्यापारी महिला ,बचतगट,प्रोसेसिंगयुनिटधारक,पर्यटन व्यावसायिक व नवउद्योजकांसाठी आर्थिक सक्षमता व व्यवसाय वाढीसाठी दिशादर्शक ठरेल यांसाठी सर्व व्यापारी वर्गाने तसेच महासंघाच्या सभासदांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री विष्णू मोंडकर जिल्हाध्यक्ष.पर्यटन व्यावसायिक महासंघ यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!