*कोकण Express*
*शेर्पे येथे विविध विकास कामांचे उपसभापती मिलिंद मेस्त्री यांच्या शुभहस्ते भूमिपूजन संपन्न*
आमदार नितेश राणेसाहेब यांच्या प्रयत्नांतून शेर्पे गावासाठी मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे मंगळवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२२ रोजी कणकवली पंचायत समितीचे नवनिर्वाचित उपसभापती मिलिंद मेस्त्री यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी वित्त व बांधकाम सभापती व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य रवींद्र ऊर्फ बाळा जठार, कणकवली पंचायत समितीच्या सदस्या तृप्ती माळवदे, भाजपा जिल्हा सरचिटणीस रवींद्र शेट्ये, भाजपा खारेपाटण शक्ती केंद्रप्रमुख सूर्यकांत भालेकर,शेर्पे सरपंच निशा गुरव, खारेपाटण माजी सरपंच किशोर माळवदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
खारेपाटण तळेरे विभागावर आमदार नितेश राणेसाहेब यांचे विशेष लक्ष असून या विभागातील विविध गावांमधील विकास कामांसाठी त्यांनी भरघोस असा निधी उपलब्ध करून दिला आहे. शेर्पे गावातील काही विकासकामे ही कित्येक वर्षांपासून प्रलंबित होती. ग्रामस्थांच्या मागणीनुसार आमदार महोदयांनी शेर्पे मुख्य रस्ता ते स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, शेर्पे मुख्य रस्ता ते जैनवाडीकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे,शेर्पे मुख्य रस्ता ते भटवाडीकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, शेर्पे बौध्दवाडीसाठी नळ पाणीपुरवठा तयार करणे या कामांसाठी विविध योजनांमधून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याबद्दल सर्व शेर्पे ग्रामस्थांच्यावतीने मा.आमदार नितेश राणेसाहेब यांचे सरपंच निशा गुरव यांनी यावेळी आभार मानले.
कणकवली पंचायत समितीच्या उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल मिलिंद मेस्त्री यांचा शेर्पे ग्रामस्थांच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन सरपंच निशा गुरव यांनी सत्कार केला. यावेळी सत्काराला उत्तर देताना उपसभापती मिलिंद मेस्त्री यांनी केंद्रीय मंत्री मा. नारायणराव राणेसाहेब आणि मा. आमदार नितेशजी राणेसाहेबांच्या माध्यमातून कणकवली पंचायत समिती विविध लोकोपयोगी कामे करत असून शेर्पे गावासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून विकास कामे आवर्जून केली जातील अशी ग्वाही दिली. सरपंच निशा गुरव यांनी यावेळी आमदार नितेश राणेसाहेबांच्या माध्यमातून गावात झालेल्या विविध विकास कामांची यादी लोकांसमोर सादर केली.
या भूमिपूजन सोहळ्यासाठी शेर्पे गावातील नामदेव कदम , नारायण पांचाळ,हेमंत पवार,बाळु पांचाळ,रामा पांचाळ, वसंत पावसकर,प्रकाश तेली, चंद्रकांत शेलार, मधुकर शेलार, महेंद्र शेलार,आमिन मुजावर, चंद्रकांत कांबळे,रवि कांबळे,विजय कांबळे,राजा पाटणकर,पंढरी कांबळे, संजय कांबळे, शबाना मनाजी,सुलभा शेलार,लता शेलार, सिराज मुजावर, महम्मद जैतापकर,अरूण ब्रह्मदंडे, विकास ब्रह्मदंडे, विलास ब्रह्मदंडे , श्रेयस शेलार,अक्षय शेलार, पप्पू ब्रह्मदंडे आदी प्रतिष्ठित ग्रामस्थ आवर्जून उपस्थित होते.