विद्यार्थीहीत लक्षात घेता शिक्षक भारती संघटना शासकिय धोरणांचा निषेध करत काळ्या फिती लावून काम करणार

विद्यार्थीहीत लक्षात घेता शिक्षक भारती संघटना शासकिय धोरणांचा निषेध करत काळ्या फिती लावून काम करणार

*कोकण Express*

*विद्यार्थीहीत लक्षात घेता शिक्षक भारती संघटना शासकिय धोरणांचा निषेध करत काळ्या फिती लावून काम करणार*

*संजय वेतुरेकर जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती*

*कासार्डे  ः संजय भोसले*

23 व 24 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कृती समितीने राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे. परंतु गेली दोन वर्षे विद्यार्थी शिक्षणापासून कोरोनामुळे वंचित राहिलेले आहेत . तसेच सध्या बारावी प्रात्यक्षिक व दहावीची पूर्व परीक्षा सुरू असल्याने अशा स्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षक भारती या शासनमान्य संघटनेच्या आदेशान्वये जिल्ह्यातील सर्व शिक्षक भारतीचे शिलेदार दिनांक 23 व 24 फेब्रुवारी च्या संपात काळया फिती लावून शासकीय धोरणांचा निषेध नोंदवत काम करणार आहेत.
शिक्षक भारती ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य संघटना असून जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी संघटनेच्या सर्व पदाधिकारी व शिलेदारांनी घ्यावी असे आवाहन जिल्हाध्यक्ष संजय वेतूरेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!