*कोकण Express*
*मुंबई गोवा महामार्ग चौपदरी करणामुळे निर्माण झालेल्या नागरी सुवीधा संदर्भात तळेरे ग्रामपंचायतीचे आमरण उपोषण आंदोलन*
*कासार्डे ः संजय भोसले*
तळेरे येथे मुंबई गोवा राष्ट्रीय
महामार्ग चौपदरीकरणाच्या कामकाजामुळे विविध स्थानिक नागरी सुविधा निर्माण झाल्या आहेत. त्यास केवळ संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग व संबंधित ठेकेदार कंपनी यांचा मनमानी व गलथान कारभार जबाबदार आहे. याबाबत वेळोवेंळी संबंधितांकडे स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी, प्राधिकरण, सामाजिक कार्यकर्ते या सर्वांनी मिळून आवश्यक तो सर्व पाठपुरावा केलेला आहे. या संपुर्ण प्रक्रियेचा मी स्वतः देखील एक सक्रिय भाग राहिलो आहे. तरीदेखील संबंधितांकडून योग्य ती दाद मिळत नाही. ही बाब लोकशाहीच्या राज्यात आश्चर्यकारक आहे.
त्यामुळे संविधानिक मार्गाने विकासात्मक मुद्द्यांवर संबंधितांच्या विरोधात स्थानिक सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय – हक्क – अधिकार व मागण्यांसाठी तळेरे ग्रामपंचायतीने उद्या दि. २३ फेब्रुवारी २०२२ रोजी तळेरे येथे उपोषण करण्याचा घेतलेला निर्णय नक्कीच योग्य व समर्थनीय आहे.
सबब सदरच्या उपोषणास मी एक सुज्ञ व सुजाण सर्वसामान्य नागरिक, एक सामाजिक कार्यकर्ता व ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या मानवाधिकार संरक्षण संघटनेचा कणकवली तालुका उपाध्यक्ष या नात्याने माझा जाहीर पाठींबा व्यक्त करून सदरच्या उपोषणात व्यक्तिशः सहभागी होत आहे.
– राजेश दिलीपकुमार जाधव