कासार्डे पंचक्रोशी प्रभागाची संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्साहात

कासार्डे पंचक्रोशी प्रभागाची संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्साहात

*कोकण Express*

*कासार्डे पंचक्रोशी प्रभागाची संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्साहात*

*कासार्डे  ः संजय भोसले*

संत शिरोमनी रविदास महाराजांची जयंती भिकाजी विठ्ठल चव्हाण कासार्डे यांच्या प्रांगणात मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील विविध मान्यवर उपस्थित होते.
सर्व प्रथम दीपप्रज्वलन श्री. संजय चव्हान (प्रभाग अध्यक्ष),यांचे हस्ते करण्यात आले तर प्रतिमा पूजन श्री. महेंद्र देवरुखकर (कासार्डे पोलीस पाटील), श्री. दत्ताराम जाधव (कणकवली तालुका उपाध्यक्ष), श्री. संजय बीलस्कर (दारुम पोलीस पाटील) यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री. विजय देवरुखकर, श्री. दत्ताराम जाधव (कणकवली तालुका उपाध्यक्ष), श्री. महेंद्र देवरुखकर (कासार्डे पोलीस पाटील), श्री. शंकर चव्हाण (गुरुजी), श्री. संतोष जाधव ( कासार्डे प्रभाग सचिव), सौ.श्वेता चव्हाण .यांनी उपस्थितांना प्रबोधित केले. या कार्यक्रमांत प्रमुख पाहुणे म्हणून कणकवली तालुका कार्यकारिणीतून तसेच जिल्हा कार्यकारिणीतून पदाधिकारी राजेंद्र चव्हाण नामदेव जाधव महानंदा चव्हाण अनंत जाधव चंद्रकांत चव्हाण उपस्थित होते. त्यांनीही खुप मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित केला होता. कार्यक्रमाची सांगता श्री संजय चव्हान (प्रभाग अध्यक्ष) यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाली.संपुर्ण कार्यक्रमाचे सुत्र संचालन व उपस्थितांचे आभार संजय बिळसकर (दारूम पोलीस पाटील) यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!