*कोकण Express*
*जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं १ चे सहाय्यक शिक्षक*
*श्रीराम लिंबराज विभूते यांना राष्ट्रीय कर्तृत्व जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित*
*कासार्डे ः संजय भोसले*
सह्याद्री राष्ट्रीय गड किल्ले साहित्य कला संमेलन, सिंधुदुर्ग २०२२ या कार्यक्रमात श्रीराम लिंबराज विभूते यांना राष्ट्रीय कर्तृत्व जीवनगौरव सन्मान पुरस्काराने पद्मश्री पुरस्कार विजेते परशुराम गंगावणे यांच्या हस्ते २० फेब्रुवारी २०२२ रोजी गौरविण्यात आले.
सध्या जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं १ ता.कणकवली या शाळेमध्ये कार्यरत आहेत.श्रीराम विभूते यांची सुरुवात २ मे २००८ साली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासार्डे तांबळवाडी या शाळेत हजर झाले पाच वर्षे उपशिक्षक पदावर काम केले,६ वर्षे त्याच शाळेत मुख्याध्यापक पदावर काम केले, मुख्याध्यापक पद आल्यानंतर त्यांनी अत्यंत दुर्गम खेड्यातील अगदी लहान शाळा असलेली या शाळेत सुमारे दहा लाख रुपये शैक्षणिक उठाव करून अंतर बाहेर बोलकी व आकर्षक शाळा तयार केली, समाजातील सर्व पालक,राजकीय,सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती तसेच उद्योग व्यावसाईक यांना सोबत घेऊन १००% डिजिटल शाळा तयार केली, क्रीडा स्पर्धामध्ये जिल्हा स्तरावर मुलांना यश मिळवून दिले, स्वतः तबला वादन, नृत्य बसवणे,उत्कृष्ट निवेदन,सूत्रसंचालन शाळा,केंद्र,प्रभागस्तरावर नेहमीच प्रतीनीधीत्व केले.प्रभागस्तरावर गुणगौरव सोहळा २०१९ मध्ये आदर्श मुख्याध्यापक व शाळेला आदर्श शाळा असे दोन्ही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्याचप्रमाणे भारत प्रतिमा गौरव पुरस्कार २०२१ कोल्हापूर येथे अभिनेते माधव अभ्यंकर यांच्या हस्ते देण्यात आला. सलग सहा वर्षे कासार्डे तांबळवाडी शाळेत मुख्याध्यापक असताना वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत नियोजनबद्ध पद्धत्तीने यशस्वी केले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,तबला वादन, नृत्य दिग्दर्शक स्वतः केले, यामूळे मुलांच्या अनेक कला गुणांचा विकास झाला, व स्नेहसंमेलन यातून सत्तर हजार बक्षिसांची रक्कम जमा करून शाळेस भरघोस निधी मिळवून दिला. यातून शाळेच्या अनेक गरजा पूर्ण करण्यात आल्या.शाळेला मुख्याध्यापक खोली,पेवर ब्लॉक,स्टोअर रूम, शाळा प्रवेशद्वार ही कामे शैक्षणिक उठवातून पूर्ण केली. कला,क्रीडा व शैक्षणिक प्रगतीत शाळा नेहमीच पुढे राहिली,तसेच त्यांचे विद्यार्थी भारतीय प्रज्ञाशोध परीक्षेत प्रत्येक वर्षी जिल्हा व राज्य गुणवत्ता यादीत झळकले या सर्व कार्याचा आढावा घेऊन हा पुरस्कार त्यांना प्रधान करण्यात आला.
या पुरस्काराने कासार्डे,तळेरे पालक,ग्रामस्थ,विद्यार्थी व विस्तार अधिकारी सुहास पाताडे , केंद्रप्रमुख गोपाळ जाधव, केंद्रप्रमुख संजय पवार ,केंद्रप्रमुख सदगुरु कुबल, शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष व माजी पं. स.सभापती दिलीप तळेकर, विद्यमान अध्यक्ष राजेश जाधव , उपाध्यक्ष सौ.सिद्धी साटम ,सरपंच सौ.साक्षी सुर्वे ,उपसरपंच दिनेश मुद्रास,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पद्मजा करंदीकर तसेच शाळेतील व तालुक्यातील सर्व शिक्षक यांच्याकडून अभिनंदन करण्यात येत आहे.