*कोकण Express*
*नांदगाव मोरयेवाडी रस्त्याचे संजना सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन*
*आम.नितेश राणेंच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर*
*नांदगाव ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील नांदगाव मोरेवाडी येथे मंगेश मोरये यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण रस्त्यासाठी 5 लाख रुपये आम.नितेश राणेंच्या स्थानिक विकास निधी मंजूर करण्यात आला असून याचे उद्घाटन आज सकाळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला आहे.
यावेळी पंचायत समिती नवनिर्वाचित उपसभापती मिलिंद मेस्त्री, पंचायत समिती सदस्या सौ हर्षदा वाळके, नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर उपसरपंच निरज मोरये, असलदे सरपंच व भाजप चे तालूका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, माजी सरपंच संजय पाटील, भाजपचे शक्ती केंद्र प्रमुख भाई मोरजकर, कमलेश पाटील, मंगेश मोरये, ग्रामपंचायत सदस्य मंगेश पाटील,ईशा बिडये , दशरथ मोरये, ऋषिकेश मोरजकर, मारुती मोरये, राजू तांबे, योगेश सदडेकर,नाना मोरये ,विजय मोरये, हरिश्चंद्र बिडये , चंद्रकांत मोरये , शंकर मोरये, आदी उपस्थित होते.
यावेळी मंगेश मोरये यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ संजना सावंत, उपसभापती मिलिंद मेस्त्री यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
संजना सावंत यांनी बोलताना सांगितले की,जे आश्वासन दिले होते त्याची पुर्तता रस्त्याच्या निमित्ताने पूर्ण झाले असून आपल्या वाडी वस्तीचा विकास फक्त नारायण राव राणे व आम नितेश राणेंच्या माध्यमातून होत आहे.
यावेळी सुत्रसंचालन ऋषिकेश मोरजकर व आभार मंगेश मोरये यांनी मानले आहेे
.