कुणकेश्वर जत्रोत्सवाच्या निमित्ताने आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून मोफत एसटी फेऱ्या

कुणकेश्वर जत्रोत्सवाच्या निमित्ताने आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून मोफत एसटी फेऱ्या

*कोकण  Express*

*कुणकेश्वर जत्रोत्सवाच्या निमित्ताने आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून मोफत एसटी फेऱ्या*

 *३ ठिकाणाहून सुटणार १० एसटी फेऱ्या ३ दिवस*

*कुणकेश्वरच्या यात्रेकरूंनी लाभ घेण्याचे आवाहन*

*देवगड ः प्रतिनिधी*

कोकणातील प्रसिद्ध देवगड तालुक्यातील श्री देव कुणकेश्वर देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव २८ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान साजरा करण्यात येत आहे. त्या दरम्यान यात्रेकरूंची प्रवासाची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आमदार नितेश राणे यांनी तीन दिवस तीन ठिकाणांवरून मोफत दररोज १० एस . टी . बस फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यात्रेकरूंची गैरसोय दूर होणार आहे. सदरहू बसेस विजयदुर्ग, कणकवली व मालवण या एस . टी . आगारांमधून दिवसभर कुणकेश्वर पर्यंत फेऱ्या मारणार असून, यात्रेकरूंसाठी मोफत प्रवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तरी यात्रेकरूनी याचा लाभ घ्यावा, असे आमदार नितेश राणे यांनी आवाहन केले आहे. या एसटी फेऱ्या पुढील प्रमाणे सुटणार आहेत, कणकवली नांदगाव मार्गे २, कणकवली कलमठ बेळणे मार्गे २ , मालवणातून नेहमीच्या मार्गाने २, मालवण आचरा मार्गे २, विजयदुर्ग पडेल कॅन्टीन मार्गे २ , अशा एसटी फेऱ्या सोडण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!