*कोकण Express*
*श्वेताज् योगा ग्रुप कणकवलीतर्फे मोफत योगशिबिर*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली येथील श्वेताज् योगा ग्रुपतर्फे ऑफलाईन 7 दिवसीय मोफत योगशिबिर कणकवली कलमठ वृंदावन हॉल येथे दि.21 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 5 ते 6.30 यावेळेत आयोजित करण्यात आले आहे.
या योग शिबिरात विविध आजारांवर योग, आयुर्वेदिक औषधोपचार माहिती, साठसूत्रीय सर्वांगीण व्यायाम प्रकार, लहान मुलांसाठी विशेष योग, सूर्यनमस्कार तसेच विविध आजारांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मोफत योग शिबिरात महिला, पुरुष व लहान मुले सहभागी होऊ शकतात. या मोफत योगशिबिरात सामील व्हायचे असल्यास 9421353799 या नंबरवर संपर्क करावा.