*कोकण Express*
*शिवजयंती निमित्त शिवप्रेमी मित्र मंडळ , माणीकचौक च्या वतीने टीव्ही स्टार सौरभ माळवदेचा सत्कार*
*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*
शिवजयंती निमित्त शिवप्रेमी मित्र मंडळ – माणीकचौक च्या वतीने रेकाॅर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी वेंगुर्ले शहरातील उदयोन्मुख कलाकार टीव्ही स्टार सौरभ माळवदे यांचा सत्कार भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांच्या हस्ते करण्यात आला .
वेंगुर्ले शहरातील डुबळे गल्ली येथील रहिवासी असलेला सौरभ माळवदे यांनी अभिनयाने कोणतेही प्रशिक्षण घेतले नसताना सुद्धा आपल्या मेहनतीने व कष्टाने छोट्या छोट्या कार्यक्रमात सहभागी होऊन आजपर्यंत हा पल्ला गाठला . घरची परिस्थिती बेताची असल्याने तसेच मुंबई मध्ये रहाणे व जेवणासाठी पैसे नसल्याने त्यावेळी वेंगुर्ले येथील खाजे , रेल्वे स्टेशनवर विकुन त्या पैशातून ऑडीशन दिली .
अभिनयाच्या जोरोवर सर्वप्रथम मालवणी सिरीयल *गाव गाता गजाली* मध्ये काम करण्याची संधी मिळाली व नंतर एका पाठोपाठ एक *बाळु मामा , स्वराज्य जननी जीजामाता , जिगरबाज , रंग माझा वेगळा , सावधान इंडिया FIR , जय जय स्वामी समर्थ* इत्यादी नावाजलेल्या सिरीयल मध्ये भुमिका करण्याचा मान मिळाला . या त्याच्या मेहनतीचा यथोचित सन्मान व्हावा म्हणून मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला .
यावेळी व्यासपीठावर लायनेस क्लबच्या नेहा यरनाळकर , प्राची मणचेकर , स्मिता कोयंडे , प्रतीक्षा मालवणकर , रुपाली पाटील , विवेक कुबल , माणीकचौक मित्रमंडळाचे नितीश कुडतरकर – रोहीत वेंगुर्लेकर – प्रथमेश यंदे तसेच मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते .