*कोकण Express*
*मनसे कणकवली कार्यालयात शिवजयंती साजरी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कणकवली येथील कार्यालयात साजरा करण्यात आला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घातला.
यावेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, संतोष सावंत,गिरीश उपरकर, प्रशांत उपरकर, शरद सावंत, मंदार सावंत, चेतन जाधव, निखिल काणेकर, मनोज घाडीगावकर. अक्षय चव्हाण, देवेन सावंत व मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.