*कोकण Express*
*आमदार नाईकांचे स्वप्न धुळीला मिळाल्यानेच सुशांत नाईक अस्वस्थ*
*जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई यांची टीका*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या तिजोरी वर डोळा ठेवून बँकेवर सत्ता मिळवत बँक लुटण्याचा शिवसेनेचा नापक मनसुबा उधळून लावल्यामुळे जिल्हा बँकेचे संचालक सुशांत नाईक यांनी आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली. जिल्हा बँकेचे संचालक पद असून दे किंवा पक्षातले कुठलेही पद असूंदे नाईक कुटुंबीयांनी पदे आपल्याला व काम करायला कार्यकर्ते हीच भूमिका आतापर्यंत घेतली असा टोला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई यांनी लगावला आहे. त्याचा प्रत्यय कालच्या जिल्हा बँक निवडणुकीच्या वेळी देखील आला अशी टीका श्री देसाई यांनी केली आहे. आमदार वैभव नाईक यांची जिल्हा बँकेच्या माध्यमातून इन्कमिंग ची पॉलिसी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत यशस्वी झाली नाही. सुशांत नाईक यांना बँकेचे व्हाईस चेअरमन करण्याचे आमदार वैभव नाईक यांचे स्वप्न धुळीला मिळाले. व एकटी भाजपा आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेसह दोन पक्षांना पुरून उरली. या दुःखातून शिवसेना व वैभव नाईक हे अजून बाहेर आलेले नाहीत. व त्याचा प्रत्यय सुशांत नाईक यांच्या नितेश राणे यांच्या वरील टीकेतून येतोय. त्यामुळे सुशांत नाईक यांनी हे दुःख विसरण्यासाठी आमदार वैभव नाईक यांचे ऐकण्यापेक्षा स्वतःच्या कर्तुत्वावर शेतकऱ्यांसाठी काम करावे आणि सहकारात काम करावे. अन्यथा राजकारणात नाईक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अशी त्यांची झालेली ओळख पुसली जाणार नाही. याची त्यांनी काळजी घ्यावी असा टोला जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई यांनी लगावला आहे.

