*कोकण Express*
*सावंतवाडी शहरात राष्ट्रवादीच्यावतीने शिवजयंती साजरी*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सावंतवाडी उभा बाजार येथील शिवाजी महाराज पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी यांच्या हस्ते पुष्पहार घालून शिवजयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले ,सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष अर्चनाताई घारे -परब ,जिल्हा उपाध्यक्ष शफीक खान, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर ,महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे, युवती जिल्हाध्यक्षा सौ सावली पाटकर, हिदायतुल्ला खान, संतोष जोईल,आसिफ ख्वाजा, जहिरा ख्वाजा , अर्षद बैग , रिद्धी परब ,संदीप राणे ,देवयानी टेमकर, सिद्धेश तेंडुलकर,फैज शैख ,सौ. पिंगुळकर मॅडम आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.