आमदार वैभव नाईक जाणून घेणार जनतेच्या समस्या

आमदार वैभव नाईक जाणून घेणार जनतेच्या समस्या

*कोकण Express*

*आमदार वैभव नाईक जाणून घेणार जनतेच्या समस्या…*

*उद्या कुडाळ प्रांत व तहसील कार्यालयात राहणार उपस्थित…*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

आमदार वैभव नाईक हे उद्या २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० ते १ वाजेपर्यंत कुडाळ प्रांत कार्यालय व तहसील कार्यालय येथे उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते लोकांच्या समस्या व कामे जाणून घेणार आहेत.
प्रांत कार्यालय व तहसील कार्यालयाशी निगडित रेशन कार्ड, धान्य पुरवठा त्याचबरोबर लोकांच्या इतर काही समस्या व कामे असतील त्यांनी यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!