सकल मराठा समाजातर्फे राबविण्यात येणारे उपक्रम स्तुत्य : समीर नलावडे

सकल मराठा समाजातर्फे राबविण्यात येणारे उपक्रम स्तुत्य : समीर नलावडे

*कोकण  Express*

*सकल मराठा समाजातर्फे राबविण्यात
येणारे उपक्रम स्तुत्य : समीर नलावडे*

*शिवजयंतीनिमित्त सकल मराठा समाजातर्फे छञपती शिवाजी महाराज चौकात उत्सव*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली 19 फेब्रुवारी (प्रतिनिधी)-छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेसाठी लढले,आता आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांचा पुतळा योग्य जागेत स्थलांतर होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.पुढील शिवजयंतीपूर्वी हा पुतळा योग्य जागेत स्थलांतरीत होण्याची सर्वांनी शपथ घेऊया असे प्रतिपादन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले. तसेच शिवजयंतीनिमित्त सकल मराठा समाजातर्फे राबविण्यात येणारे उपक्रम स्तुत्य असल्याचेही कौतुकोद्गार समीर नलावडे यांनी शिवजयंती उत्सव कार्यक्रमात बोलताना काढले.

शिवजयंतीनिमित्त सकल मराठा समाजातर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंती उत्सवानिमित्त विविध स्पर्धा व कार्यक्रमाचे आयोजन केले आहे . याचा शुभारंभ नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते झाला.यावेळी उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे , शिवसेना नेते संदेश पारकर , जिल्हा बँकेचे संचालक सुशांत नाईक , मराठा समाज नेते एस . टी . सावंत , लवू वारंग , सकल मराठा समाज अध्यक्ष भाई परब, सुशील सावंत , सोनू सावंत , महेंद्र सांब्रेकर , बबलू सावंत , एस.एल . सकपाळ , महेश सावंत , जिल्हा बँकेचे संचालक सुशांत नाईक , बाबू गायकवाड , नगरसेविका मेघा गांगण , कविता राणे , मेघा सावंत , माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम , अशोक करबळेकर , किशोर राणे , डॉ . सूर्यकांत तायशेट्ये , आनंद पारकर , संजय मालडकर , शशिकांत राणे,संजय राणे,भगवान लोके,संतोष राऊळ,प्रतीक्षा सावंत , राजश्री धुमाळे , तन्वी भावे , शैली सावंत , स्वाती राणे , प्रतिक्षा साटम तेजस राणे,समीर प्रभुगावकर ,अनंत राणे आदींसह सकल मराठा समाजाचे पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या उपस्थित होते.

यावेळी बोलताना शिवसेना नेते संदेश पारकर म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराज हे लोककल्याणकारी राजे होते. त्यांचे शौर्य व कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे . प्रत्येकाने शिवरायांची प्रेरणा घेऊन काम केले पाहिजे . शिवरायांचे विचार व गुण प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजेत . शिवजयंती हा उत्सव साजरा होत असताना वातावरण शिवमय झाले आहे शिवाजी महाराज यांच्याबद्दलची प्रेरणा घेण्यासाठी हे कार्यक्रम आहेत . छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केल्यामुळे आम्ही सन्मानाने जगतो आहोत.

एस.टी सावंत म्हणाले , शिवाजी महाराज हे फक्त मराठा समाजाचे नव्हते , तर सर्व सर्व जाती व धर्मांचे आहेत.शिवजयंती ही केवळ महाराष्ट्रातपुरती साजरी न होता देशभर साजरी होण्यासाठी राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली . शिवाजी महाराज हे रयतचे राजे होते , त्याची कीर्ती जगभर होती त्यांना रोखण्यासाठी मुस्लिम राष्ट्र प्रयत्न करत होते . त्यावर मात करत त्यांनी स्वराज्याची स्थापना केली.
जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक म्हणाले , सकल मराठा समाजातर्फे विविध उपक्रम राबिवले जात आहेत. हे उपक्रम स्तुत्य आहेत. समाजातर्फे राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांना आपले नेहमीच सहकार्य राहील , अशी ग्वाही त्यांनी दिली . यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने विविध मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला तसेच वक्तृत्व , चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!