सिंधुदुर्गनगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवनाच्या इमारतीचे काम येत्या दोन महिन्यात पूर्ण होणार

सिंधुदुर्गनगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवनाच्या इमारतीचे काम येत्या दोन महिन्यात पूर्ण होणार

*कोकण  Express*

*सिंधुदुर्गनगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवनाच्या इमारतीचे काम येत्या दोन महिन्यात पूर्ण होणार*

*जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांची माहिती*

*सिंधुदुर्ग*

सिंधुदुर्गनगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवनाच्या इमारतीचे संपूर्ण काम येत्या दोन महिन्यात पूर्ण होईल असे नियोजन सिंधुदुर्गनगरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात झालेल्या तातडीच्या बैठकीत करण्यात आले.
या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विनायक जोशी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाचे अभियंता श्री कांबळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्यक अभियंता युतीका केनी तसेच ठेकेदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सिविल वर्क करणाऱ्या ठेकेदाराकडून आपल्या मीटरचे लाईट बिल भरने लांबले होते. मात्र आता पूर्वीच्या ठेकेदाराने आपले लाईट बिल भरले आहे. त्यामुळे फर्निचर चे आणि इलेक्ट्रिकवरचे काम करणाऱ्या दोन्ही ठेकेदाराना स्वतंत्र मीटर देण्यात आला आहे .यामुळे ही कामे आता सुरू झाली आहेत. ही कामे दोन महिन्यात पूर्ण होतील असे नियोजन करण्यात आले . त्यासोबतच स्मारकामध्ये जो आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे त्यासंबंधीची कागदपत्रे दोन ते चार दिवसात पूर्ण करण्यात येतील. असे गणेश जेठे यांनी बैठकीत सांगितले.त्यामुळे हाही प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे .त्यामुळे येत्या दोन महिन्यात या भवनाचे काम पूर्ण होईल असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!