*कोकण Express*
*नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ यांच्या वतीने सर्व व्यापारी बांधव व नागरीक यांनी आप्पासाहेब पटवर्धन चौकात *छत्रपती शिवाजी महाराज* यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आज दिनांक १९/०२/२०२२ रोजी नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ (आप्पासाहेब पटवर्धन चौक, कणकवली) *आपण आहात म्हणून आम्ही* आणि *ॐ नमो भगवते भालचंद्राय* यांच्या वतीने सर्व व्यापारी बांधव व नागरीक यांनी आप्पासाहेब पटवर्धन चौकात *छत्रपती शिवाजी महाराज* यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने जेष्ठ पत्रकार श्री अशोक करंबेळकर आणि श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या उपस्थितीत,श्री जमिल कुरैशी व श्री सचिन कुवळेकर, यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी सर्व उपस्थितांनी महाराजांच्या चरणी पुष्पांजली अर्पण केली.
छत्रपती शिवाजी महाराजांसारखा “खराखुरा जाणता राजा” कधीही होणार नाही. शौर्य, पराक्रम, माणुसकी, संस्कार आणि भूतदया यांच्या बरोबरीनेच कर्तव्य कठोर व कुशल प्रशासक असे अलौकिक व्यक्तीमत्व म्हणूनच सर्व भारतीयांना छत्रपती शिवाजी महाराज किती प्रिय आहेत, ते शिवजयंती साजरी करताना दिसुन येते,
यवनांचे अतिक्रमण व धर्म प्रसारण रोखण्याचे व हिंदू धर्म टिकविण्याचे फार मोठे काम महाराजांनी केले, पण ते करताना अन्य धर्म, जातींवर आपण अन्याय करण्याचें कटाक्षाने टाळुन महाराजांनी जी परंपरा सुरू केली तिचा, आजच्या समाजाने अंगिकार केला पाहिजे. तरच भारत देश महासत्ता बनेल. असे मत जेष्ठ पत्रकार श्री अशोक करंबेळकर यांनी या प्रसंगी व्यक्त केले.
या प्रसंगी २४ तास समाजासाठी कार्यरत राहणाऱ्या “पोलीस दलाचे प्रतिनिधी म्हणून ” श्री अशोक माने” या वाहतूक पोलिसाचा श्री अशोक करंबेळकर यांच्या हस्ते आणि श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कारही करण्यात आला. उपस्थित सर्वानी त्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
एक संघ समाजासाठी सर्वच राजकीय प्रणाली व धार्मिक अनुयायी यांनी आज कार्य करणे आवश्यक आहे, असे घडले तरच समाजात निर्माण होणारी अनाठायी भिती आपोआपच नष्ट होऊन, भारत देश कमीतकमी कालावधी गतीमान प्रगती करेल, असे प्रतिपादन श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी केले.