*कोकण Express*
*शिवजयंती दरवर्षी प्रत्येक घराघरात सण उत्सव म्हणून साजरी व्हायला हवी -अभिनेत्री सौ अक्षता कांबळी *
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुरत्न फाऊंडेशन महाराष्ट्र च्या अध्यक्षा अभिनेत्री सौ अक्षता कांबळी यांच्या प्रमुख उपस्थितीत जाणवली आदर्श नगर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली ,यावेळी आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त असलेल्या सौ प्रभात पाताडे, व इतर महिलांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व पुष्पहार घालून शिवरायांचे पूजन करण्यात आले , या वेळी सौ अक्षता कांबळी यांनी उपस्थित महिलांना उत्तम मार्गदर्शन केले प्रत्येक महिलेने जिजाऊंच्या विचारांचा आदर्श घेऊन आपल्या मुलांना संस्कार द्यावेत शिवजयंती हा दिवस प्रत्येक घराघरात सण उत्सव म्हणून साजरा व्हावा असे आवाहन केले ,यावेळी सौ डॉ नीता रावण ,सौ मयुरा भंडारे ,सौ मिलन पाटील ,सौ सरिता पाटील ,सौ लक्षुमी गवस ,सौ जान्हवी परब ,सौ श्रद्धा पाटील ,सौ शीतल मुंज ,सौ स्नेहल तांबे , सौ अमिता राणे दळवी ,कु अर्चना राणे ,कु सुप्रिया पाटील ,कु अमिता राणे ,कु दिशा गोसावी ,कु सिद्धिका गोसावी,कु जान्हवी रावण ,कुमार अर्णव रावण उपस्थित होते ,यावेळी ग्रंथीक काळसेकर व वेदांत मुंज यांनी शिवरायांच्या मावळ्यांची वेशभूषा करून कार्यक्रम ची शोभा वाढवली ,शेवटी सौ अमिता राणे दळवी यांनी सौ अक्षता कांबळी आणि सर्व महिलांचे आभार मानून कार्यक्रम ची सांगता केली