*कोकण Express*
*वागदे शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश आ.नितेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील वागदे गावातील शिवसेना शाखाप्रमुख विजय घाडीगांवकर यांनी शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजपा आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी युवासेना विभागप्रमुख सुर्यकांत घाडीगांवकर, शिवसैनिक सागर घाडीगांवकर, सत्यवान घाडीगांवकर, आदेश घाडीगांवकर, दिनेश घाडीगांवकर, अभय घाडीगांवकर, गुरुनाथ घाडीगांवकर, बुधाजी घाडीगांवकर यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.यावेळी भाजप कणकवली तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, वागदे शक्ती केंद्र प्रमुख संदीप सावंत,समीर प्रभुगावकर, गोविंद घाडीगांवकर, शिरी घाडीगांवकर, महेश गोसावी आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.