अखेर आमदार नितेश राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत संचालक पदी निवड

अखेर आमदार नितेश राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत संचालक पदी निवड

*कोकण Express*

*अखेर आमदार नितेश राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत संचालक पदी निवड*

*कणकवली ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपा प्रणित सिद्धिविनायक सहकार पॅनेलने निर्विवाद बाजी मारल्यानंतर आता या जिल्हा बँकेच्या स्वीकृत संचालक पदासाठी आमदार नितेश राणे यांचे नाव केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कडून निश्चित करण्यात आले आहे. त्याच बरोबर दुसऱ्या स्वीकृत संचालक पदासाठी प्रकाश मोर्ये यांचे नाव निश्चित झाले आहे. आमदार नितेश राणे यांची थकबाकी असल्याचे कारण देत बँक निवडणुकीत मतदार यादीतून त्यांचे नाव वगळण्यात आले होते. मात्र आमदार नितेश राणे या संपूर्ण निवडणुकीत “किंगमेकर” च्या भूमिकेत होते. आणि आता स्वीकृत संचालक म्हणून आमदार नितेश राणे यांनी स्वतः जिल्हा बँकेत इंट्री केल्यामुळे जिल्हा बँकेच्या वर्तुळात एक वेगळेच ट्विस्ट निर्माण झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या आजच्या बैठकीत ही निवड करण्यात आली आमदार नितेश राणे हे आता जिल्हा बँकेत उपस्थित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!