*कोकण Express*
*वेंगुर्लेत महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कल्पवृक्षांचे वृक्षारोपण*
*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*
राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी केलेल्या सुचनेनुसार वेंगुर्लेत कल्पवृक्ष वृक्षारोपण कार्यक्रम महिला प्रदेश सचिव सौ. नम्रता कुबल यांच्या हस्ते व सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादीच्या बेसिक, युवती सेल, ओबीसी सेल, सोशल मिडीया सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
नारळ हा कल्पवृक्ष लावण्याऱ्या प्रत्येक व्यक्तीस तो आपल्याला शेवटपर्यंत उपयोगी ठरतो. तो एक प्रकारे लागवड करणाऱ्या व्यक्तीस सर्व बाबतीत मदत करतो. त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व सामान्य जनतेची कामे करतो आहे. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच जनतेसाठी कल्पवृक्ष ठरणार आहे. असे प्रतिपादन महिला प्रदेश सचिव सौ. नम्रता कुबल यांनी केले.