बीएसएनएलच्या एक्सचेंज कार्यालयाला आग;आगीत बीएसएनएलच्या केबल जळून खाक

बीएसएनएलच्या एक्सचेंज कार्यालयाला आग;आगीत बीएसएनएलच्या केबल जळून खाक

*कोकण Express*

*बीएसएनएलच्या एक्सचेंज कार्यालयाला आग;आगीत बीएसएनएलच्या केबल जळून खाक*

*नगरपंचायतच्या अग्निशमन बंबाद्वारे आग विझवण्याचे प्रयत्न*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली तालुक्यात कलमठ नाडकर्णीनगर येथे असलेल्या बीएसएनएल एक्सचेंज ऑफिसमध्ये शॉर्टसर्किटने सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आग लागली. अजूनही आग सुरूच असून, घटनेची माहिती मिळताच बीएसएनएलचे कर्मचारी गणेश वाघाटे यांनी नगरपंचायत अग्निशमन बंबाला पाचारण केले. घटनेची माहिती मिळताच नगरसेवक शिशिर परुळेकर हे देखील घटनास्थळी दाखल झाले. आगी मुळे बीएसएनएलच्या कार्यालयातील केबल बहुतांशी प्रमाणात जाळाल्या असून अजूनही आग धुमसत आहे. नगरपंचायतीच्या अग्निशमन बंब द्वारे आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!