*कोकण Express*
*शिवरायांच्या अश्वरुढ पुतळ्याची 19 फेब्रु.ला भव्य मिरवणूक …!*
*कणकवली तालुका शिवसेनातर्फे आयोजन…!*
*शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवसेना कणकवली तालुकाच्यावतीने येथील पटवर्धन चौकात शनिवार 19 फेबु्रवारीला साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्ताने सकाळी 10.30 वा. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन करण्यात येणार आहे. तसेच शिवरायांच्या अश्वरुढ पुतळ्याची भव्य मिरवणूक ढोलताशांच्या गजरात सायंकाळी 6 वाजता पटवर्धन चौक ते बाजरपेठ मार्गे तेली आळीतून शिवसेना शाखेपर्यंत काढण्यात येणार आहे. याशिवाय शिवसेना शाखेमध्ये सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आलेले आहे. शिवजयंतीचे औचित्यसाधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांसाठी आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते सतीश सावंत, संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, अतुल रावराणे, महिला
जिल्हाप्रमुख नीलम पालव, शिवसेना सहकार प्रमुख संदेश पटेल, शिवसेना युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, आधी शिवसेनेचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते
उपस्थित राहणार आहेत.तरी सर्व छत्रपती शिवाजी महाराज प्रेमींनी तसेच शिवसैनिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका प्रमुख शैलेश
भोगले, प्रथमेश सावंत, शहर प्रमुख शेखर राणे, आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव प्रमुख माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी केले आहे.