*कोकण Express*
*राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध विकास व क्रीडा युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांचे पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत*
*कणकवली ः प्रतिनिधी*
राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध विकास व क्रीडा युवक कल्याण मंत्री सुनील केदार सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असताना, सायंकाळी ५ वाजता भिरवंडे गावातील “नाद इनोव्हेटिव्ह गोट फार्म” ला भेट देण्यासाठी जाते वेळी नरडवे नाक्यावर फटाके वाजवून स्वागत केले
याप्रसंगी मंत्री महोदयांनी *श्रीधर नाईक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले*
यावेळी माजी खासदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत उपस्थित होते,
श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, यावेळी सोबत तालुकाध्यक्ष प्रदिप मांजरेकर, तालुका उपाध्यक्ष निलेश नारायण मालंडकर, कणकवली शहर अध्यक्ष महेश तेली, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
यावेळी जिल्हा सरचिटणीस महेंद्र सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.