*कोकण Express*
*आयडीयल नर्सिंग स्कूल आणि सिंधुगर्जना ढोलताशा पथक कणकवली आयोजित मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद*
दिनांक १४ फेब्रुवारी रोजी आयडीयल नर्सिंग स्कूल आणि सिंधुगर्जना ढोलताशा पथक कणकवली आयोजित मोफत आरोग्य शिबीर व विनामूल्य औषधोपचार डॉ. अनिल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी ठीक ३ ते ७ या वेळेत श्री स्वयंभू विद्यामंदिर शाळा क्र.२ बांधकरवाडी कणकवली येथे आयोजित करण्यात आले होते, या शिबिरामध्ये रुग्णांना अनुभवी डॉक्टरांकडून सल्ला व मार्गदर्शन तसेच निदान झालेल्या आजारांवर मोफत औषधोपचार करण्यात आले या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रप्रमुख सौ. दळवी मॅडम,डॉ.अनिल ठाकूर, प्रा. हरीभाऊ भिसे, जि. प शाळा क्र.२ मुख्याध्यपिका सौ. सावंत मॅडम, सौ. राणे मॅडम, सौ. सावंत मॅडम, श्री.गवळी सर,कणकवली अर्बन निधी बँक चे सेक्रेटरी श्री.रंजन चव्हाण, सर्वेश भिसे, शुभम पवार, नितीन चव्हाण आणि सिंधुगर्जना पथकाचे सर्व सदस्य उपस्थित होते यावेळी बोलताना सौ. दळवी मॅडम म्हणाल्या की ढोल पथकाचा वादनात जो उत्साह दिसतो त्याचप्रमाणे सामाजिक उपक्रम देखील उत्साहाने राबविण्यात नेहमी सहभाग असतो आणि हे कार्य खरेच वाखाणण्याजोगे आहे, या शिबिरामध्ये १२८ रुग्णांवर मोफत उपचारांसह मोफत औषधे देण्यात आली व विविध चाचण्या देखील करण्यात आल्या