*कोकण Express*
*शिवसेनेच्या महिला मेळाव्याला मसुरेत उत्स्फूर्त प्रतिसाद*
*मालवण ः प्रतिनिधी*
शिवसेना महिला आघाडीच्या वतीने मालवण मसुरे येथे आयोजित केलेल्या महिला मेळाव्याचा शुभारंभ कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. या महिला मेळाव्याला मसुरे पंचक्रोशीतील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मेळाव्यामध्ये महिलांसाठी पैठणी स्पर्धा घेण्यात आली. तसेच हळदी कुंकू कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाला आ. वैभव नाईक यांच्या पत्नी स्नेहा नाईक, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, शिवसेनेच्या प्रयत्नांतून जिल्ह्यात सुरू होत असलेल्या शासकीय मेडिकल कॉलेजसाठी यावर्षीपासून प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थी आता एम.बी.बी.एस होणार आहेत. परिणामी जिल्ह्यात चांगले डॉक्टर उपलब्ध होतील. महिलांना रोजगार मिळाला पाहिजे यासाठी शिवसेना काम करत असून सिंधुरत्न योजनेतून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. महिलांनी कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी सोडू नये. त्यासाठी शिवसेना सर्वोतपरी सहकार्य करेल. अशी ग्वाही आ. वैभव नाईक यांनी दिली.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, तालुका संघटक दीपा शिंदे, तालुका समनवयक पूनम चव्हाण, उपजिल्हा संघटक सेजल परब, पंचायत समिती सदस्य गायत्री ठाकुर, सरपंच संदीप हडकर, उपसरपंच राजेश गावकर, सुहास पडणेकर, सचिन पाटकर, राघवेंन्द्र मुळिक, बाळू भोगले, अनिल मेस्त्री, सुरेश असलदेकर, माजी नगरसेविका आकांक्षा शिरपुटे, उपतालुका संघटक पूजा तोंडवळकर, सौरभी आंबरे, शहर शाखाप्रमुख पेडणेकर, राजश्री आजगावकर उपशहर प्रमुख नंदा सारंग, शाखा संघटक विद्या फर्नांडिस, गायत्री ठाकूर,आनंदी परब, अदिती मेस्त्री, पूजा ठाकूर, मानसी चव्हाण आदी पदाधिकारी महिला उपस्थित होत्या.
यावेळी घेतलेल्या खेळ पैठणीच्या कार्यक्रमात अनुक्रमे प्रथम मयुरी गुराम, द्वितीय समृद्धी आचरेकर, तृतीय हर्षाली मुळीक या विजेत्या ठरल्या. या कार्यक्रमाला मसुरे पंचक्रोशीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.