*कोकण Express*
*ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेच्या प्रसिद्धी प्रमुखपदी पत्रकार संजय खानविलकर यांची नियुक्ती*
*कासार्डे ः संजय भोसले*
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेच्या प्रसिद्धी प्रमुखपदी पत्रकार संजय खानविलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष एम.डी.चौधरी व राष्ट्रीय सचिव जावेद शिकलकर,महाराष्ट्र राज्य निरीक्षक घनश्याम सांडीम यांच्या मार्गदर्शनानुसार सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक व जिल्हा निरीक्षक मनोज तोरस्कर यांनी जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी संजय खानविलकर यांची निवड जाहीर केली आहे.
राष्ट्रीय सचिव जावेद शिकलकर, महाराष्ट्र राज्य निरीक्षक घनश्याम सांडीम, महाराष्ट्र राज्य सचिव संतोष शेटे,पुणे कार्यालय प्रमुख राकेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण येथे संघटनेच्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या वेळी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष संतोष नाईक यांनी जाहीर केले.
याप्रसंगी राष्ट्रीय सचिव जावेद शिकलकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र व ओळखपत्र देण्यात आले.
यावेळी उपस्थित राष्ट्रीय पदाधिकारी व राज्य पदाधिकारी तसेच
जिल्हा संघटना व तालुका संघटना पदाधिकाऱ्यांकडून जिल्हा संघटनेचे नवनियुक्त प्रसिद्धी प्रमुख संजय खानविलकर यांचे अभिनंदन करण्यात आले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.